राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारताबाबत मोठं विधान केलं आहे. तरूणांनी ठरवलं तर त्यांच्या म्हातापणाआधीच अखंड भारत होईल, असा आशावाद मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. नागपुरातील श्री अग्रसेन छात्रावासात सरसंघचालकांनी बुधवारी ( ६ ऑगस्ट ) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.

‘अखंड भारत कधीपर्यंत होईल’ असा प्रश्न विचारल्यावर मोहन भागवत म्हणाले, “अखंड भारत कधीपर्यंत होईल, हे मी सांगू शकत नाही. ज्योतिषाकडे पाहायला लागेल. पण, तरुणांनी ठरवले तर त्यांच्या म्हातारपणाआधीच अखंड भारत होईल. अखंड भारत म्हणजे केवळ नकाशावरच्या रेषा पुसणे नाही. त्यासाठी आमच्या नजीकच्या देशांमध्ये भारतीयत्व रुजवणे आवश्यक आहे.”

raveena tandon on saif ali khan attacked
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

हेही वाचा : २००२ पर्यंत संघाच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? अखेर सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं स्पष्टीकरण

“भारतापासून वेगळे झालेले अनेक देश आज चूक केली, हे मान्य करतात. आम्ही एकाच भारतभूमीचे अंग आहोत. अखंड भारतात यायचे असेल तर त्यांना स्वार्थ, कट्टरता आणि फुटीरवाद सोडावा लागेल. त्यावेळी काहीही बदल न करता सगळे एक होऊ. आम्ही आजही नजीकच्या देशांना मदत करतो. कारण, आम्ही सर्व एकाच भारत मातीत जन्मलो आहे,” असं मोहन भागवत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “राजा चुकला तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं”, मोहन भागवतांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

“संविधानाने दिलेलं आरक्षण संघालाही मान्य”

‘‘भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे,” असे मोहन भागवत यांनी सांगितलं.

Story img Loader