Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years : विजयादशमीच्याच दिवशी नागपुरातील मोहिते वाड्यात १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन केले जाते. नागपुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे संघाच्या विजयादशमी उत्सवावर पावसाचे सावट असले तरी सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. घोषाच्या वादनात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणारे हे संचलन केवळ स्वयंसेवकांमध्ये नाही तर नागरिकांमध्येही राष्ट्रभक्तीची भावना जागृत करते. संचलनाद्वारे विविध महापुरुषांनाही अभिवादन करण्यात येते. त्यामुळे संघात पथसंचलनाला एक वेगळे महत्त्व आहे.

हेही वाचा – राज्यपालांसोबत संवादासाठी केवळ ३८ जण! मोजक्याच लोकांना संधी…

हेही वाचा – धक्कादायक! भाजपा नेत्या नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं निनावी पत्र

शनिवारी पहाटे ५.५५ वाजता यंदा व्यवसायी आणि विद्यार्थी अशा दोन पथसंचलनाला रेशीमबाग मैदानातून भर पावसात सुरुवात झाली. वेगवेगळ्या मार्गावरुन एकाचवेळी दोन पथसंचलन निघाले असून पहिले पथसंचलन रेशीमबाग, क्रीडा चौक, अपोली फार्मसी, बॅटरी हाऊस, उमेरड मार्ग रेशीमबाग मैदानावर तर दुसरे पथसंचलन हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ मधून बाहेर निघून पुष्पांजली– देवांजली अपार्टमेंट, गजानन चौक, आराध्य ज्वेलर्स, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर मैदान, सुरेश भट सभागृहासमोरुन रेशीमबाग मैदानावर पोहोचले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संगम टाकीजच्या मागच्या भागात असलेल्या मैदानातून पथसंचलनाचे अवलोकन केले. पथसंचलनादरम्यान अनेक भागातील नागिरकांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss marks 100 years sangh swayamsevaks marched in heavy rain in nagpur dag 87 ssb