नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्षाचा प्रारंभ रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सोमवारी सकाळी झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्घाटन समारंभाला सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी रामदत्त उपस्थित होते. ते म्हणाले, संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करण्यात येते. वर्गात सहभागी स्वयंसेवकांनी इतर प्रांतातून आलेल्या दोन स्वयंसेवकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करायला हवेत. त्यांच्या प्रांतातील समस्यांची माहिती करून घ्यावी. स्वयंसेवकांनी समाजातील प्रश्नांवर चर्चा करणारे होण्याऐवजी समाधान शोधणारे व्हावे. लवकरच संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांनी संघ कार्यविस्तारसंदर्भात आपली भूमिका काय असावी, याबाबत विचार करावा.

हेही वाचा – अमरावती : चक्‍क मॉलमधून ‘आयपीएल’वर सट्टेबाजी

यावेळी सहसरकार्यवाह मुकुंदजी, अवध प्रांत संघचालक तसेच वर्ग सर्वाधिकारी कृष्ण्मोहनजी उपस्थित होते. यंदाच्या वर्गात एकूण ६८२ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. वर्गाचे पथसंचलन २१ मे २०२३ रोजी सायंकाळी होईल. तर वर्गाचा समारोप १ जून २०२३ रोजी होणार आहे.