प्रत्येक भारतीयाने विचारपूर्वक आणि १०० टक्के मतदान केले पाहिजे असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. मतदान करताना हा माझ्या जातीचा आहे, असा विचार न करता देशासाठी करा. जातपात सोडून द्या, भारत कसा वाढेल याचा विचार करा. भारताला अखंडत्व जो देईल, भारताचे तुकडे होण्यापासून वाचवेल त्याला मतदान करा. कुठलाही पक्ष १०० टक्के चांगला नाही. पण त्यातल्या त्यात जो बरा आहे, त्याला मतदान करा असे म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.
चुनाव में मतदान न करना अथवा NOTA के अधिकार का उपयोग करना, मतदाता की दृष्टि में जो सबसे अयोग्य उम्मीदवार है उसी के पक्ष में जाता है, इसलिए राष्ट्रहित सर्वोपरि रखकर 100 प्रतिशत मतदान आवश्यक है.#RSSVijayaDashami pic.twitter.com/dt2rJopOdo
— RSS (@RSSorg) October 18, 2018
ज्या पक्षामध्ये पारदर्शकता दिसून येते. ज्यांची निती राष्ट्रहितासाठी आहे. तसेच प्रामाणिक व सत्चरित्र उमेदवार पाहून मतदान करा. मतदान तर सर्वजण करतात. पण यावेळी हा विचार व्हायला हवा.
निवडणुकीत मतदान न करणे किंवा NOTA अधिकाराचा उपयोग करणे म्हणजे मतदात्याच्या दृष्टीने जो सर्वांधिक अयोग्य उमेदवार आहे, त्यालाच तो कौल जातो. त्यामुळे राष्ट्रहितासाठी १०० टक्के मतदान आवश्यक आहे. संघ कुठल्याही राजकीय पक्षासोबत नाही, हे भागवत यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. आपल्या मताचा विचारपूर्वक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.