नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात नागपूर शहर आरटीओने संकेत बावनकुळे यांच्या चारचाकी वाहनाची बुधवारी पून्हा तपासणी केली. परंतु आरटीओ या वाहनाची गती तपासणार नसल्याची धक्कादायक माहिती असल्याने पून्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरटीओचे पथक बुधवारी पून्हा सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेले. या पथकाने अपघातग्रस्त वाहनाची सोमवारीही प्राथमिक निरीक्षण केले गेले होते. परंतु पथकाकडे वाहनाची चाबी नसल्याने त्यांनी कारच्या आतमध्ये तपासणी केली नव्हती. दरम्यान पथकाकडून वाहनाला कोणत्या भागाला क्षती झाली आहे. अपघातात वाहनातील काही दोष कारणीभूत आहे काय? या पद्धतीने तपासाची सूचना असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान या पथकाकडून वाहनाची गती मात्र तपासली जाणार नाही. तर हे काम वाहतूक पोलिसांची समिती अथवा वाहन कंपनीमार्फत तपासले जाते, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी आरटीओने केलेल्या तपासणीत कारच्या समोरचा टायर कापलेला आढळून आला, तसेच , कारचे बोनेटसह इतर भागात क्षतीग्रस्त होता, इतरही धक्कादायक माहिती पथकाच्या निदर्शनात आली. कारमधील एअर बॅग अपघातानंतर उघडल्या नसल्याचेही निरीक्षण याप्रसंगी नोंदवले गेले. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार या वाहनाची गती खूप जास्त नसल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या निरीक्षणानंतर आरटीओच्या चमूकडून सुमारे एक ते दीड तासातच हा अहवाल इंटिग्रेटेड रोड एक्सिडेंट डेटा (आय रेड) या संकेतस्थळावर अपलोड केल्या जाण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली जात आहे. दरम्यान आरटीओच्या अपघातानंतरच्या निरीक्षणात साधारणपने गतीचेही निरीक्षण नोंदवले जाते. परंतु या प्रकरणात गतीवर मात्र लक्ष केंद्रीत केले जात नसल्याने पून्हा आरटीओच्या पथकावरही दबाव आहे काय? हा प्रश्न विरोधतांकडून उपस्थित केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आरटीओच्या पथकाकडून सदर वाहनाच्या निरीक्षणादरम्यान विविध दिशेने छायाचित्र काढण्यासह व्हिडिओ रेकाॅर्डिंगही काही प्रमाणात करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा : गडचिरोली: पोलिसांची तत्परता, महिलेसाठी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवले …

प्रकरण काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार हे ऑडी कारने काचीपुरा चौकातून अनियंत्रित गतीने जात होते. सेंट्रल पॉईट हॉटेलसमोर त्यांनी एका कारला धडक दिली. ती धडक एवढी भयंकर होती की ऑडी कारचाही समोरचा भाग चक्काचूर झाला तर धडक बसलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताचा सर्व थरार दर्शवणारे सीसीटीव्ही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. हे वाहन संकेत बावनकुळे यांच्या मालकीची आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप होत आहे.