नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात नागपूर शहर आरटीओने संकेत बावनकुळे यांच्या चारचाकी वाहनाची बुधवारी पून्हा तपासणी केली. परंतु आरटीओ या वाहनाची गती तपासणार नसल्याची धक्कादायक माहिती असल्याने पून्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरटीओचे पथक बुधवारी पून्हा सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेले. या पथकाने अपघातग्रस्त वाहनाची सोमवारीही प्राथमिक निरीक्षण केले गेले होते. परंतु पथकाकडे वाहनाची चाबी नसल्याने त्यांनी कारच्या आतमध्ये तपासणी केली नव्हती. दरम्यान पथकाकडून वाहनाला कोणत्या भागाला क्षती झाली आहे. अपघातात वाहनातील काही दोष कारणीभूत आहे काय? या पद्धतीने तपासाची सूचना असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नागपूर हिट ॲन्ड रन: बावनकुळेंच्या वाहनाची गती आरटीओ तपासणार नाही?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2024 at 16:19 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto will not check the speed of chandrashekhar bawankule s son sanket bawankule vehicle hit and run case mnb 82 css