बुलढाणा: बुलढाण्यातील गणेश मंडळांच्या संख्येत व दमदार परंपरेत घट होत असताना रुद्र गणेश मंडळाने मात्र आपला लौकिक कायम ठेवला आहे. यंदा मंडळाने चारधाम पैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचा भव्य व आकर्षक देखावा सादर केला आहे. संगम चौकातील हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ९.४६ लाखाचे देयक काढण्यासाठी मागितली एक लाखाची लाच; बाजार समितीचे सभापती, उपसभापती अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात

काही वर्षांपूर्वी पर्यंत बुलढाण्यातील सर्व मुख्य चौक व नगरात सार्वजनिक मंडळांची स्थापना करण्यात येत होती. मंडळात निकोप स्पर्धा असल्याने  भव्य देखावे साकारण्यात येत होते. ते पाहण्यासाठी  शहरच नव्हे तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ गर्दी करीत होते. मात्र हे चित्र बदलले असून मंडळाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर रुद्र मंडळाने मात्र ही परंपरा कायम ठेवली आहे.

मंडळातर्फे दरवर्षी भव्य देखावे सादर करण्यात येतात. तसेच सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येतात. यंदा मंडळाने  केदारनाथ चा देखावा उभारला आहे. हा देखावा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत हा देखावा पाहण्यासाठी भाविक व नागरिक गर्दी करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rudra ganesh mandal grand and attractive kedarnath temple decoration for ganpati scm 61 zws