लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपन्या व गुंतवणूकदारांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणाऱ्यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत. जल-जंगल-जमीन वाचवण्यासाठी देशभर जनआंदोलने करणारे आंदोलक संसाधन रक्षणाचे खरे अहिंसक सत्याग्रही आहेत. राज्यकर्ते हे जनतेचा विचार नाही तर निवडणुकांचा विचार करणारे आहेत, अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.

समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी आयोजित दिव्यग्राम २०२३ महोत्सवात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, स्वागताध्यक्ष ॲड. स्नेहल संतोष उपरे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, समाजसेवक डॉ. गिरीधर काळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. लालसू नोगोटी, नर्मदानगरचे सरपंच पुण्या वसावे, राहुल आसूटकर, अनंता रासेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेधा पाटकर यांना जीवनगौरव व फोर्ब्स यादीतील प्रभावशाली तरुण ठरलेला चंद्रपूर येथील सारंग कालीदास बोबडे यांना सेवार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रिटीश सरकारचा चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्कार प्राप्त ॲड. दीपक यादवराव चटप व महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झालेले विशाल नारायण उपरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

आणखी वाचा-नागपुरातील दंत महाविद्यालयाला ‘नॅक’कडून ‘ए प्लस’

मेधाताईंचे कार्य सर्वश्रूत आहे. सारंग बोबडे या तरुणाने मदतीसाठी उभे केलेले काम प्रेरणादायी आहे. चार दशकांपासून डॉ. गिरीधर काळे यांनी लाखो अस्थिरुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना बरे केले. ही कर्मयोगी माणसेच समाजाचे भूषण आहे. सेवार्थ गृपच्या युवकांनी १२ वर्षांपासून प्रबोधनाचा हा वसा घेतला. अशा कृतीशील युवकांच्या पाठीशी समाजाने भक्कम उभे रहावे, असे मत शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी यावेळी व्यक्त केले.