नागपूर: सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनीही विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत ‘रियाच्या फोनचा झोलझोल, एयूची होणार पोलखोल..’ असे नारे देत आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला.आदित्य ठाकरे आणि मुंबईला सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांचा धिक्कार असो.., महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो.., वारकरी संप्रदायचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो.., त्या ४४ फोनचा लागला छडा, एयूच्या पापाचा भरला घडा.. तसेच मुंबई आमची शान आहे हिंदुस्थानची जान आहे अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. या आंदोलनात गोपीचंद पडाळकर, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रवीण दटके, समीर मेघे व सत्ताधारी पक्षातील आमदार सहभागी झाले होते.
‘रियाच्या फोनचा झोलझोल, एयूची होणार पोलखोल’; सत्ताधाऱ्यांची आदित्य ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजी
त्या ४४ फोनचा लागला छडा, एयूच्या पापाचा भरला घडा.. तसेच मुंबई आमची शान आहे हिंदुस्थानची जान आहे अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिल्या.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
Updated: First published on: 22-12-2022 at 15:51 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling parties raised slogans against aditya thackeray outside vidhan bhavan in nagpur over the disha salian case mnb 82 tmb 01