नागपूर: सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनीही विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत ‘रियाच्या फोनचा झोलझोल, एयूची होणार पोलखोल..’ असे नारे देत आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला.आदित्य ठाकरे आणि मुंबईला सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांचा धिक्कार असो.., महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो.., वारकरी संप्रदायचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो.., त्या ४४ फोनचा लागला छडा, एयूच्या पापाचा भरला घडा.. तसेच मुंबई आमची शान आहे हिंदुस्थानची जान आहे अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. या आंदोलनात गोपीचंद पडाळकर, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रवीण दटके, समीर मेघे व सत्ताधारी पक्षातील आमदार सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा