बुलढाणा: आजचा दिवस सराफा बाजारात खळबळ उडवून देणारा ठरला. परिसरातील एका कुटुंबाने सामूहिक विष प्राशन केल्याच्या अफवेने परिसर हादरला. मात्र उलगडा झाल्यावर वेगळ्याच कारणाने तिघेजण अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट झाले.
सराफा मध्ये राहणारे आंबेकर परिवारातील तिघेजण अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. त्यांना रुग्णवाहिकाद्वारे तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सामूहिक विष प्राशनाची अफवा पसरली. यामुळे परिसरवासी जिल्हा रुग्णालयात जमा झाले. दरम्यान वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर वेगळेच कारण समोर आले. यानुसार विनायक आंबेकर हे न्हाणीघरात गेले असता गॅसगीझर मुळे ऑक्सिजन ची कमतरता झाल्याने त्यांचा श्वास कोंडला. त्यामुळे त्यांना मूर्च्छा आली. त्यांना या अवस्थेत पाहून पत्नी ज्योती व मुलगी आरती यांनाही अस्वस्थ वाटू लागले.
हेही वाचा… लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात उसळी… असे आहेत आजचे दर
दरम्यान या तिघांची प्रकृती आता चांगली असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे अफवा किती घातक असतात हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.