लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया: तिरोडा- तुमसर मार्गावरील बिरसीफाटा परिसरातील नाल्याजवळ शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धावत्या इंडिका कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने मागेहून येणाऱ्या दुचाकी चालकाने कार चालकाला आगीबाबत सांगितल्याने मोठा अनर्थ टळला.

आणखी वाचा-न्यायमूर्ती गवईंना गडचिरोलीतील रानटी हत्तींनी घातली भुरळ, म्हणाले…

तिरोडा तालुक्यातील काचेवाणी येथील संतोष पारधी व महेंद्र रहांगडाले वडेगाववरून रात्री साडेनऊ वाजतादरम्यान गावाकडे परत येत होते. बिरसी नाल्याजवळ त्यांच्या इंडिका कारला अचानक आग लागली. मागेहून येणाऱ्या दुचाकी चालकाने त्यांना सतर्क केले. दोघेही त्वरित कारमधून खाली उतरल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. काही वेळातच कार पूर्ण जळून राख झाली. थोड्या वेळात तिरोडा नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग विझवली. तिरोडा ठाण्याचे पोलीस दल देखील घटनास्थळी पोहोचले होते. उल्लेखनीय आहे की, दोन दिवसांपूर्वी तिरोड्यातच एका शिक्षिकेच्या धावत्या स्कूटीलाही आग लागल्याची घटना घडली होती.