नागपूर : एका व्यक्तीने एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढले असता पाचशे रुपयांच्या हुबेहुब परंतु बनावट नोटा बाहेर निघाल्या. बँकेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्रिमूर्तीनगरातील एका बँकेच्या बाजूलाच एटीएम मशीन असून त्यातून पैसे जमा करणे आणि पैसे काढणे असा व्यवहार करता येतो. आठवड्याभरापूर्वीच एका ग्राहकाने एटीएममधून पैसे काढले असता त्याला पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आल्या होत्या. त्याने बँकेकडे तक्रार केल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक अग्निवा शहा यांनी एटीएम मशीनची तपासणी केली असता त्यांना ५०० रुपयांच्या पाच नकली नोटा आढळल्या.

हेही वाचा – नागपूर: फुटाळ्यावर भरधाव कारसह युवकांची ‘स्टंटबाजी’

आठवड्याभरापूर्वी अज्ञात युवकाने ग्रामीण भागातील एका व्यक्तीच्या नावे या नोटा जमा केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार मंगेश काळे यांनी दिली.