बुलढाणा : सत्ताधारी घटकपक्ष असलेल्या रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज, सोमवारी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भेट घेतली. त्यांनी तुपकरांच्या आंदोलनाला समर्थन देत राज्य सरकारला धारेवर धरले. बुलढाणा न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यावर तुपकर यांनी सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा – ४० सीसीटीव्ही फुटेज, ७१ वाहनांची तपासणी, तरीही ठाणेदाराचे पिस्तूल मिळेना
हेही वाचा – नागपूर : हिवाळी अधिवेशन काळात खोदकाम नको, महावितरण म्हणते…
सरकारने अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर राज्य चालवू नये, असा सल्ला देत खोत यांनी एक प्रकारे सरकारला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, वस्तुतः तुपकर यांनी कापूस-सोयाबीन प्रश्नावर मोर्चा काढल्यानंतर सरकारकडून तातडीने संवाद व कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता, त्यांनी पुढच्या आंदोलनाची तयारी केल्यावर त्यांना अटक करण्यात आली.