नागपूर: राज्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघाताचे सत्र सुरू आहे. नवे रस्ते बनवण्याचे काम सुरू असल्यामुळे अथवा चालकाच्या चुकीमुळे अनेकदा मोठे अपघात होत असतात. ११ ते ते १८ जानेवारीपर्यंत यंदा ३५ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह संपूर्ण देशातच मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. यावर्षापासून रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘सेफ वे रोड सेफ्टी सोल्युशन्स इंडिया’द्वारा चार चाकी वाहन, तीन चाकी तथा दुचाकी वाहनांवर ‘इमर्जन्सी क्यू आर कोड’ लावण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. याचा प्रथम टप्पा नागपुरातून सुरू होणार आहे. रस्त्यावर होणारे अपघातात, अपघातग्रस्त जखमींना तत्काळ मदत मिळावी या हेतूने या क्यूआर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. अनेकदा रस्त्यांवर अपघात झाल्यास अपघात ग्रस्तांची ओळख नसल्यामुळे त्याला वेळेत मदत मिळण्यास विलंब होतो. एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास अथवा गंभीरपणे जखमी झाल्यास या अपघाताची माहिती त्याचा परिवाराला मिळण्यासही किमान पाच ते सहा तासांचा अवधी लागतो. अपघातग्रस्त हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याच्या परिवाराला माहिती मिळत नाही. अपघात ग्रस्तांची ओळख पटविण्याकरिता पोलिसांनासुद्धा मोठा कालावधी लागतो. त्यामुळे यावर उपाय शोधण्यात आला आहे.

हेही वाचा : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”

सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अपघाग्रस्ताला वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येकाजवळ भ्रमनध्वनी असतो. परंतु, त्याला पासवर्ड असते. त्यामुळे तो उघडता येत नाही. त्यामुळे यापुढे अपघातग्रस्त गाडीला ‘इमर्जन्सी क्यू आर कोड’ लावण्यात येणार आहे. यामुळे अपघातग्रस्ताचा भ्रमनध्वनी क्रमांक कळू शकेल. तसेच एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना तत्काळ माहिती पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ‘एसएमएस’ सुविधेचा वापर केला जाणार आहे. याशिवाय या ‘क्यू आर कोड’मध्ये तात्काळ रुग्णवाहीका सेवा मिळणार आहे. यासाठी रुग्णवाहिका सेवा १०८ तथा पोलीस सेवेसाठी ११२ सारख्या महत्त्वाच्या बटन्स निर्मित केल्या आहेत. तसेच अनेकदा बरेच प्रमाणावर गाड्यांचा पार्किंगचा मोठा विषय सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होतो. वाहन शिस्तबद्ध पद्धतीने राहत नाही. यावरसुद्धा आळा घालण्यासाठी या क्यू आर कोडमध्ये ‘नो पार्किंग’ची माहिती देणाऱ्या बटन जोडण्यात आली आहे.

हेही वाचा : बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…

हा क्यूआर कोड कुठल्याही अँड्रॉइड मोबाईलमधून सहजपणे स्कॅन केला जाऊ शकतो. ज्याला कोणलाही पैसे देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने गाडीवर हा ‘इमर्जन्सी क्यू आर कोड’ लावणे महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानाची आज नागपूर येथील मॉडेल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गणेश टेकडी रोड नागपूर येथून करण्यात आली. यावेळी अनेक चार चाकी वाहनांना क्यू आर कोड लावण्यात आले, व त्याविषयीची माहिती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेफ्टी रोड सेफ्टी सोल्युशन्सचे शशिकांत भोयर, अमृतलाल चरडे, राजहंस शेंडे आदी उपस्थित होते.

Story img Loader