नागपूर : मध्यप्रदेशच्या मंडला येथील दोन वर्षीय चिमुकलीने खेळता-खेळता ‘सेफ्टी पिन’ गिळली. ती अन्ननलिकेत अडकल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला. मात्र, नागपुरातील सुपरस्पेशालिटी इस्पितळात  डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात गॅस्ट्रोइंट्रॉलॉजीच्या चमूने तीन तासाच्या अथक प्रयत्नाने एन्डोस्कोपीच्या मदतीने  पिन काढण्यात यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनुष्का गैगवाल (२) असे मुलीचे नाव आहे. तिचे वडील महेश हे मंडला गावात मजुरी करतात. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अनुष्काचे स्वेटर फाटल्याने तिच्या आईने तेथे ‘सेफ्टी पिन’ लावली होती. खेळताना अनुष्काने पिन काढली व तोंडात टाकली. ती पोटात गेल्यावर तिला त्रास होऊ लागला. तिच्या हातात पिन नसल्यामुळे तिने ती गिळली असावी असा संशय आला. तिला त्वरित प्रथम गावातील व नंतर  जबलपूरच्या रुग्णालयात हलवले. मात्र, अनुष्काची ओकारी थांबत नव्हती. सोमवारी सायंकाळी तिला मेडिकल (रुग्णालय)मध्ये  दाखल केले. दुसऱ्या दिवशी सुपरस्पेशालिटीतील गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागात हलवण्यात आले. तेथे ही पिन अन्ननलिकेत अडकल्याचे निदान झाले. डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अमोल समर्थ आणि डॉ. नितीन गायकवाड यांनी अवघड

शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पिन बाहेर काढली. यासाठी डॉ. हरित कोठारी, डॉ. रवि दासवानी, डॉ. अभय गाणार, डॉ. योगेश झवर आणि इतरांची मदत मिळाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे कळताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

चिमुकलीच्या अन्ननलिकेत फसलेली सेफ्टी पिन काढण्यासाठी एन्डोस्कोपिक प्रक्रिया सुरू असताना अचानक मंगळवरी दुपारी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे थोडय़ावेळासाठी डॉक्टर घाबरले, डॉक्टरांनी धीर न सोडता इन्व्हर्टरने वीजपुरवठा पूर्ववत होताच पुन्हा प्रक्रिया सुरू करून पिन काढली.