राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कोश्यारी यांचा पेहराव असलेल्या धोती व टोपीचा जाळून निषेध करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बुलढाणा: खासदार राहुल गांधी गुजरातकडे रवाना, दोन ठिकाणी प्रचार सभा

हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय तसेच महापुरुषांचा वारंवार अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून निष्कासित करावे. तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचेवर थोर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी आज सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतीच्या नावाने निवेदन देण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी व आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा. जर ते राज्यपालपदाचा राजीनामा देत नसतील तर राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी त्यांना राज्यपाल पदावरून निष्काशीत करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुध्दा छत्रपती शिवरायांबद्दल अवमानजनक उद्गार काढले आहेत. यामुळे दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

हेही वाचा- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बनावट यादीमुळे गोंधळ; बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता

केळवद येथे प्रतिकात्मक तिरडी आंदोलन; शिवप्रेमींनी शोकसभा घेऊन दिली श्रध्दांजली

राज्यपालांच्या निषेधार्थ केळवद ( ता. चिखली) येथे प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करून स्मशानात शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. बुलढाणा-जालना राज्य महामार्गावरील केळवद येथे आज सोमवारी दुपारी १२ वाजता हे आंदोलन करण्यात आले. बसस्थानक ते स्मशानभूमी दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. तंटा मुक्ती अध्यक्ष नारायण वाणी यांनी समोर पाण्याचे मडके धरले. या तिरडी आंदोलनात गणेश निकम केळवदकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, सरपंच प्रताप पाटील, माजी सरपंच द्वारका भोसले, नांदूअप्पा बोरबळे, बाजीराव उन्हाळे, श्रीकृष्ण गवते, मुन्ना पाटील, अशोक मोहिते, ज्ञानदेव कालेकर , गणेश यंगड, गोपाल वाघमारे यांच्यासह गावकरी बहुसंख्येने सहभागी झाले. कोश्यारी मुर्दाबाद, या कोश्यारीचे करायचे काय खाली मुंडके वरती पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. प्रेतयात्रा स्मशानात पोहोचल्यावर तिथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.