चंद्रपूर;बल्लारपूर वेकोली अंतर्गत पवनी सब एरीया कार्यालयाने २०१६ पासून साखरी ग्रामपंचायतचा १४ कोटी ८८ लाख गृहकर्ज थकीत केल्यामुळे मुख्य कार्यालयास कुलूप ठोकले. ही कारवाई पंचायत समिती राजुरा आणि साखरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. या घटनेमुळे वेकोली प्रशासनात खळबळ उडाली आहे. राजुरा तालुक्यात बल्लारपूर वेकोली अंतर्गत कोळसा खाणींचे मोठ्या प्रमाणात जाळे आहेत. यामध्ये साखरी ग्रामपंचायत अंतर्गत पवनी कोळसा खदान येथे २०१६ पासून साखरी ग्रामपंचायत अंतर्गत १४ कोटी ८८ लाखाचा गृह कर्ज थकित आहे.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणासाठी पुन्हा कायदा करण्याची घोषणा; फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री
याबाबत ग्रामपंचायत आणि पंचायत समिती राजुरा अंतर्गत गृहकर भरण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला .मात्र वेकोली कडून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामावरही परिणाम झालेला दिसून आला. ही बाब मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कडे सुनावणीसाठी सुद्धा गेलेली होती. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गृहक्कर भरण्याबाबत विस्तार अधिकारी यांच्या निर्णय कायम ठेवला आणि गृह वसूल करण्याबाबत आदेश पारित केला. ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशानुसार राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, विस्तार अधिकारी रवी रत्नपारखी, ग्रामसेविका वंदना माथरकर, सरपंच प्रणाली मडावी आणि सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत आज १९ डिसेंबरला सायंकाळी चार वाजता बल्लारपूर वेंकोली अंतर्गत पवनी सब एरिया कार्यालयास ताला ठोकले. या कारवाईमुळे वेकोलि प्रशासनात खळबळ उडाली आहे. बल्लारपूर वेंकोली अंतर्गत धोपटाळा, सास्ती व गोवरी ग्रामपंचायत ही मध्ये जवळपास ५० कोटीचे गृहकर्थकित असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी यांनी दिली. हा निधी वेळोवेळी ग्रामपंचायत तिला मिळाल्यास गावातील विकास कामांना चालना मिळेल आणि विकास कामे मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मात्र याबाबत वेकोली नेहमीच नकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे ग्राम पंचायतीसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. पंचायत समिती,राजुरा आणि ग्रामपंचायत ने केलेली ही धाडसाची कारवाइ समजण्यात येत आहे. वेकोली कडून ग्रामपंचायतींचा गृहकर थकविण्यात येतो याबाबत वेकोली अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट नाही असे पंचायत समितीतील संवर्ग विकास अधिकारी सांगतात. मात्र याबाबत कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा निधी हा वेंकोलीकडे थकीत आहे आणि गावातील विकास कामे ठप्प झालेली आहेत. आज झालेल्या कारवाईनंतर पवनी सब एरिया कार्यालयाचे मॅनेजर प्रसाद यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा >>> “माझ्या लक्षवेधी लागत नाहीत, हक्क डावलण्यात येतोय”, भास्कर जाधव विधानसभेत संतप्त; राहुल नार्वेकर म्हणाले…
ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या स्थायी समितीमधील निर्णयानुसार गृहकर रक्कम वसुली बाबतचे आदेश होते. त्या अनुषंगाने पंचायत समिती राजुरा व साखरी ग्रामपंचायत येथील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली . गृह कर्ज मिळत नसल्यामुळे गावातील विकास कामे रखडलेली आहेत . मागील सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र जवळपास १४ कोटी ८८ लाख गृह कर्ज वेकोलीने ग्रामपंचायतला जमा केले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.ही रक्कम मिळाल्यास गावातील विकास कामांना गती मिळेल. -हेमंत भिंगारदिवे, संवर्ग विकास अधिकारी,राजुरा.