वर्धा : आरोग्य खात्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचे एप्रिल ते जून या महिन्यांचे वेतन येत्या २४ तासांत जमा होण्याची हमी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. पराडकर यांनी आज दिली. थकीत वेतनासाठी आयटक सलग्न संघटनेने आंदोलन चालविले होते. चार दिवसांत वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तेव्हा तत्परतेने दखल घेण्यात आल्याचे संघटनेचे राज्य सचिव दिलीप उटाने यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : गोंडखैरी कोळसा खाणीच्या जनसुनावणीत असे काय घडले की अनिल देशमुख आल्यापावली परतले? जाणून घ्या…

आठही तालुक्यांच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या खात्यात ४ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपये जमा होणार. कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम येणार असल्याची खात्री मिळाली. गत चार वर्षांपासून प्रेरणा प्रकल्पाचे मानधन कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. त्याबाबत पाठपुरावा होणार आहे. आशा समन्वयक दिपाली चांडोळे, ज्योत्स्ना राऊत, प्रमिला वानखेडे, जयश्री गायकवाड, दुर्गा वाघमारे, वैशाली निमसडे, पुष्पा शंभरकर, सुनीता नीलसलकर, सविता ढोक, अलका शंभारकर, रंजना मोहितकर व अन्य पदाधिकारी वाटाघाटीत सहभागी झाले होते.

Story img Loader