नागपूर : अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली.

डॉ. आशिक बराडे (४२) रा. कोलते लेआऊट, मानकापूर असे डॉक्टरचे नाव असून त्याचे गोधनीत रुग्णालय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अजनीत २८ मार्च २०२३ रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संबंधातून महिलेने डॉ. बराडेंच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

हेही वाचा – नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अधिकाऱ्यांनाच फसवण्याची धमकी

परंतु, बलात्काराचा आरोपी व डॉक्टर महिलेला बाळाची माहिती देत नव्हते. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात डॉक्टरने खोटे कागदपत्र तयार करून हे बाळ इतरांचे असल्याचे भासवून त्याची विक्री केल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरला अटक केली. या डॉक्टरने या आधीही असे कृत्य केले का, हे पोलीस तपासत आहेत.