यवतमाळ : जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज असले तरी अजूनपर्यंत पेरणी योग्य पाऊस झाला नाही. वेळेवर धावपळ नको म्हणून शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे व खतांची खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकर्‍यांच्या अडचणीचा आणि अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्रातून बोगस खताची विक्री करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट खताचे पाच नमूने फेल आहे. विक्रीवर बंदी घालत पाचशे बॅगचा साठा होल्ड करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: तेलगंणाच्या सीमावर्ती तालुक्यात चोरबीटी तस्करांचे मोठे रॅकेट सक्रीय; ३ हजार रूपये किलो दराने विक्री

गेल्या काही वर्षांपासून एकही हंगाम शेतकर्‍यांना साथ देत नाही. लागवड खर्चही निघत नसल्याने शेती सातत्याने तोट्यात जात आहे. त्यातच कृषी विक्रेते शेतकर्‍यांच्या माथी बोगस बियाणे व खते मारत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखीच वाढ होत असल्याची ओरड केली जात आहे. खरीप हंगामात होणारा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाची भरारी पथके असली तरी त्यांचा काही फरक पडत नाही, असे शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली होती. सोयाबीन, कापसाला भाव न मिळाल्याने शेतकर्‍यांनी अखेरपर्यंत घरातच माल ठेवला. भाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखरे खरीप हंगामापूर्वी दोन पैसे हातात पडतील, या अपेक्षेने कवडीमोल भावात कापूस, सोयाबीनची विक्री केली.

खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे व खत विक्रेते सक्रीय झाले आहे. शेतकर्‍यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून विक्री केली जात आहे. गेल्या वर्षी तीन व यंदा दोन, असे केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट कंपनीच्या खताचे पाच नमुने फेल निघाल्याने शेतकर्‍यांसह कृषी विभागात खळबळ उडाली आहे. यंदा नमुन्याचा अहवाल येण्यापूर्वी केपीआर खताची विक्री झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कागदोपत्री वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळेच चित्र असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. अशाप्रकारे अन्य कंपन्यांनीदेखील फायदा लाटल्याची शंका व्यक्त होत आहे.

हेही वाचा – एमपीएससीचा निम्न श्रेणी लघुलेखक पदाचा निकाल जाहीर, येथे पहा निकाल

गेल्या वर्षी तीन व यंदा दोन, असे एकूण पाच केपीआर सिंगल सुपर फॉस्फेट कंपनीच्या खताचे नमूने फेल निघाले आहे. त्यामुळे पाचशे बॅगचा साठा होल्ड करण्यात आला आहे. सदर कंपनीचा परवाना रद्द असल्याने खत विक्रीचा प्रश्‍न उद्भवत नाही. या खताच्या विक्रीवर बंदीच घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लवाळे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of bogus fertilizer to farmers in yavatmal district and claim of holding stock of 500 bags nrp 78 ssb