अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यायामशाळेत जाणारे युवक पिळदार शरीरयष्टीसाठी प्रतिबंधित असलेले अँनाबॉलिक स्टेरॉइडचे सेवन करीत आहेत. शहरातील अनेक दुकानांमध्ये हे स्टेरॉइड व बनावट प्रोटीनची सर्रास विक्री होत आहे. याकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळे युवा पिढीच्या भविष्याला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक! सिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता

उत्तम शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुणांची धडपड सुरू असते. त्यासाठी काही युवक अँनाबॉलिक आणि स्टेरॉईड घेतात. स्टेरॉइड हे प्रतिबंधित औषध असूनही शहरातील अनेक दुकानांमध्ये सर्रास विकले जाते. कोतवाली, सक्करदरा, वाठोडा, शांतीनगर, जरीपटका, अजनी, सीताबर्डी, धरमपेठ, पाचपावली, सदर, अंबाझरी, खामला, तहसील आणि धंतोली या परिसरातील काही दुकानांमधे बनावट प्रोटीन आणि स्टेरॉइडचा समावेश असलेल्या पावडरची विक्री सर्रास केली जाते. प्रतिबंधित असलेले औषध मिसळल्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाने बनावट प्रोटीन आणि स्टेरॉईड खपवले जाते. यापूर्वी पाचपावली पोलिसांनी एका दुकानावर आणि घरावर छापा घालून मोठ्या प्रमाणात स्टेरॉइडयुक्त औषधाचा साठा जप्त केला होता. तो साठा दिल्लीतून आला होता. मात्र, थातूरमातूर कारवाई झाल्याने त्याच दुकान मालकाने शहरात आणखी दुकाने उघडून बनावट प्रोटीन आणि स्टेरॉइडची विक्री सुरू केली आहे.

पोलीस, गुन्हे शाखा शांत का?

शहरातील काही दुकानातून बनावट प्रोटीन आणि स्टेरॉईड विक्री होत असल्याची माहिती असूनही पोलीस आणि गुन्हे शाखा कोणतीही कारवाई करीत नाही. ठाणेदार आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षकांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळेच स्टेरॉइड विक्रेत्यांवर कारवाई होत नाही.

हेही वाचा >>>“ऑस्करसाठी निवड होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ चित्रपट असे होत नाही”, नागराज मंजुळेंनी व्यक्त केले मत

स्टेरॉइड सेवनाचे दुष्परिणाम

स्टेरॉइडचा वापर केल्यास पुरुषांमध्ये मानसिक समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. स्टेरॉइडचा वापर बंद केल्याने त्यांची शक्ती कमी होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. या भीतीमुळे स्टेरॉइडचा फार जास्त वापर केल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. स्टेरॉइडचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये खोकला, सर्दी अशा समस्या सतत होण्याचा धोका असतो.

स्टेराईडचा वापर अजिबात करू नये. हे शरीरासाठी हानीकारक आहे. स्टेराईडमुळे रक्तदाब, साखरेचे प्रमाण वाढणे, हाडे ठिसूळ होणे, किडनीवर विपरीत परिणाम, शारीरिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता असते. – डॉ. प्रकाश देव, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.