नागपूर: लोकसभा निवडणूकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीने घवघवीत यश मिळाले. यावेळी महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर पून्हा ईव्हीएम यंत्रावर विविध राजकीय पक्षांकडून शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतपत्रीकेवर घेतल्या गेल्या. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्याने महत्वाचे भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख शनिवारी प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, विधानसभा निवडणूकीत महायुतीचा झालेला विजय संशयाच्या भोवऱ्यात आहे. या विजयानंतर सामान्य नागरिकांकडून ईव्हीएमबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांकडूनच मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु याकडे अद्यापही गांभिर्याने लक्ष दिले जात नाही.

दरम्यान छत्तीगडमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्यात आल्या आहेत. तेथे भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आगामी काळात संभावित स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्याची गरज आहे. त्याबाबत ईमेल आणि पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनही पाठवले असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, शैलेंद्र तिवारी उपस्थित होते.

सलील देशमुखांचे म्हणने काय?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम बद्दल अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच अनेक जन ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयातही गेले आहे. यामुळे मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी मोठया प्रमाणात पुढे येत आहे. ही मागणी राजकीय पक्षासोबत आता सामान्य नागरीकही करत आहे. अनेक ग्राम पंचायतीने तसे ठरावही घेतल्याचेही सलील देशमुख म्हणाले.

छत्तीसगडची निवडणूक कशी झाली?

नुकत्याच छत्तीसगढ येथे स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका छत्तीसगढ राज्य निवडणुक आयोगाने मतपत्रिकेवर घेतल्या आहे. यासाठी त्यांनी काही नियमावली सुध्दा तयार केली होती. यात प्रामुख्याने, मतदान केंद्रावरुन जर मतपत्रीका चोरुन नेण्याचा प्रयत्न किंवा चोरी केल्यास काय कारवाई करावी, मतपत्रिकेच्या सुरक्षा संबधात स्ट्रॉग रुम कशी असावी, मतपेटी कशी असावी व मतपत्रीकेची छपाई कशी करावी, मतपेटीचा उपयोग कसा करावा या गोष्टी स्पष्ट केल्या गेल्या. त्यातच निवडणूक होताच एक तासानंतर लगेच मतमोजनी करून रात्री २ वाजता निकालही जाहिर केल्याचेही सलील देशमुख म्हणाले.