लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : “निरंतर १८ तास अभ्यास’’ उपक्रम राबवून चंद्रपूर वीज केंद्र आणि नागपूरच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनी बाबासाहेबांना अभिवादन केले. “कहीं हम भूल न जायें” या अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी चंद्रपूर आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांनीसुद्धा अठरा तास निरंतर अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या उपक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजता चंद्रपूर मधील ऊर्जानगर सीएसटीपीएसच्या स्नेहबंध सभागृहामध्ये आणि सकाळी सहा वाजता नागपूरच्या त्रिमूर्ती नगर मध्ये झाली. दोन्ही ठिकाणी रात्री बारा वाजता मिष्ठान्न वाटून ह्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

हेही वाचा… वीज कर्मचाऱ्यांच्या ‘अपघात विमा योजने’च्या वाढीव शुल्कावरून संताप!

याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन करण्यात आले. चंद्रपूरमध्ये जवळपास ७५ सहभागींना इंजि. बाळू रत्नपारखी आणि इंजि. संदीप मेश्राम यांनी मार्गदर्शन केले आणि नागपूरमध्ये जवळपास ४० सहभागी सदस्यांना अ‍ॅड. अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. चंद्रपूरमध्ये या अभिनव उपक्रमाचे आयोजन “कहीं हम भूल न जाये” या अभियानाच्या अंतर्गत क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, ऊर्जानगरच्यावतीने करण्यात आले.

हेही वाचा… भंडारा: रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणीची फसवणूक; अत्याचार करून परराज्यात नेले पळवून, दोन आरोपी ताब्यात

या अभूतपूर्व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजल मेश्राम, डॉ. संगीता बोदलकर, इंजि. जयश्री रत्नपारखी, एकता मेश्राम, चैताली रामटेके, भारती मंडपे, पुष्पा गाणारे, माधवी बोरकर, आदींनी परिश्रम घेतले, असे जिल्हा माध्यम प्रभारी आम्रपाली बागेसर यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salute to dr babasaheb ambedkar with 18 hours continuous study activity kahi hum bhul na jaye in chandrapur rsj 74 dvr