वर्धा : सामान्यांच्या प्रश्नावर अत्यंत आक्रमक राहणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मंगेश विधळे (५१) यांचा आज सकाळी नऊ वाजता झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
विधळे आज अमरावतीवरून आपल्या दुचाकीने त्यांच्या सोनोरा ढोक या गावी येण्यास निघाले होते. गावालगत असतानाच त्यांच्या गाडीला बोलेरो या मालवाहू गाडीची धडक बसली. हेल्मेट तुटून पडले. त्याच अवस्थेत त्यांना पुलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा – यवतमाळ : पोलीस म्हणून बतावणी केली अन्…; युवकाला लुटणाऱ्या तिघांना अटक
मराठा सेवा संघाचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. संघटना घराघरात पोहोचविण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, अशी माहिती संघटनेचे सुधीर गिरहे यांनी दिली.
First published on: 25-04-2023 at 13:49 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji brigade mangesh vidhale died in an accident pmd 64 ssb