लोकसत्ता टीम विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून आत्ता संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडच्या नागपूर विभागातील पदाधिका-यांची बैठक पार पडली व त्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपूरमध्ये कॉंग्रेसचा घोळ काही संपेना, देशमुख यांचा शिक्षक भारतीला पाठिंबा

संभाजी ब्रिगेड व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत आघाडी केली होती. या निवडणुकीत पाठिंबा द्यावा अशी विनंती अडबाले यांनी संभाजी ब्रिगेडला केली होती. त्यानुसार ब्रिगेडने निर्णय घेतला, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. शिवसेनेने या आधीच अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.