नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व शहरातील मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लवकरच होईल. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ मागण्यात आली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा- नागपूर : दसऱ्याला ८५ हजार जणांनी केला मेट्रोने प्रवास

शहरातील मेट्रोच्या कामठी व पार्डी मार्गावरील मार्गिकांची कामे पूर्ण झाली आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार, असे यापूर्वी फडणवीस यांनीच जाहीर केले होते. पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, लवकरच या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यासाठी त्यांची वेळ मागितली आहे. समृद्धीचे काही काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यावर तारीख जाहीर केली जाईल.

Story img Loader