वर्धा : समुद्रपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक डगवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. डगवार हे गत वीस वर्षांपासून काँग्रेसचे पदाधिकारी होते.
तसेच जिल्हा काँग्रेसचे दहा वर्षे सचिव, १५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी संस्थेचे १५ वर्षे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवित त्यांनी या भागात काँग्रेस जिवंत ठेवली. यापुढे या परिसरात वांदिले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मजबूत करू, अशी हमी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांना दिली.
हेही वाचा – पावसाळा सुरू, नागपूर जिल्ह्यातील शाळांच्या स्थितीचे काय?
प्रवेश प्रसंगी कार्याध्यक्ष प्रलय तेलंग व अन्य उपस्थित होते. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असतो, त्यामुळे डगवार यांचा प्रवेश पक्षाला उभारी तर काँग्रेसला माघारी नेणारा ठरणार.