नागपूर : भाजपाच्या नेत्या सना खान यांचे हत्याकांड घडण्याला अनैतिक संबंध आणि अश्लील चित्रफिती हे कारण असल्याचे समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आरोपी अमित शाहूने सना खान यांना नागपुरातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले होते व त्याच्या अश्लील चित्रफितीही तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपाचे नागपुरातील एक वरिष्ठ नेते आणि युवा मोर्चाशी संबंधित काही युवा पदाधिकारी, दोन नगरसेवकांसह काहीजणांच्या हृदयाची गती वाढल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितला आमदारकीची निवडणूक लढवायची होती. मात्र, त्यासाठीचे पैसे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग सापडत नव्हता. याच दरम्यान मध्यप्रदेशात भाजपाने आयोजित केलेल्या शिबिरात भाजपा नेत्या सना यांच्याशी त्याची भेट झाली. तेथूनच अमितने आपला राजकीय प्रवास सुरू केला. सनाद्वारे मोठमोठ्या नेत्यांना शारीरिक संबंधाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार करून आमदारकीची तिकीट मिळवण्याचे अमितने ठरवले. त्यानुसार सना खान यांना मध्यप्रदेश आणि नागपुरातील काही राजकीय नेत्यांकडे जाण्यासाठी बाध्य केले. त्यामध्ये व्यावसायिक आणि भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – धक्कादायक! राज्यात ११ लाख ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर

मित्रांच्या लॅपटॉमध्ये सना यांच्या चित्रफिती?

सना खान यांचा खून केल्यानंतर अमितने सर्वप्रथम सना यांच्या चित्रफिती मध्यप्रदेशातील एका आमदाराच्या मेहुण्याच्या लॅपटॉपमध्ये संग्रहित करून ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात या चित्रफितींचा गैरवापर करण्याची व त्यांच्या माध्यमातून भाजपा नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – विमानात रक्ताच्या उलट्या, प्रवाशाचा मृत्यू

मृतदेह नदीत फेकलाच नाही?

सना यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरन नदीत फेकल्याची माहिती अमितने पोलीस कोठडीत दिली. मात्र, हत्याकांडाला २० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही पोलिसांना मृतदेह सापडला नाही. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट दुसरीकडेच लावून अमित पोलिसांची दिशाभूल करीत असल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sana khan murder case some political leaders on the radar of the police adk 83 ssb