उमरेड-करांडला अभयारण्यातून मानसिंगदेव अभयारण्य गाठणाऱ्या ‘बली’ नामक वाघाच्या स्थलांतरणाविषयी दोन्ही अभयारण्य व्यवस्थापनाच्या अनभिज्ञतेने वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. वाघांचे स्थलांतरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि स्थलांतरणामागची कारणेही अनेक आहेत. मात्र, आजतागायत झालेल्या स्थलांतरणांपैकी अनेक स्थलांतरण हे धोक्याच्या ठिकाणाहून म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग ओलांडून झाले आहेत. त्यामुळे या स्थलांतरण प्रक्रियेतील वनखात्याच्या अधिकाऱ्यांची भूमिका आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वाघांच्या सुरक्षेसाठी राज्याचे वनखाते ‘रेडिओ कॉलर’ हा पर्याय अमलात आणत आहेत, पण ‘जय’ नामक वाघाच्या बेपत्ता होण्याने आणि ‘श्रीनिवास’चा मृत्यू उशिरा उघडकीस येण्याने या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवावा का अशी परिस्थिती आहे. वाघांचे स्थलांतरण हे एका संरक्षित क्षेत्रातून दुसऱ्या संरक्षित क्षेत्रातच नव्हे तर राखीव वनक्षेत्रातूनही वाघांचे स्थलांतरण झाले आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव वनक्षेत्रातून दोन वाघ स्थलांतरित झाले. वाघांचे स्थलांतरण हे यापूर्वीही होत होते, आता अत्याधुनिक यंत्रणेमुळे हे स्थलांतरण उघडकीस येत आहे. यानंतरची वनखात्याची भूमिका आणि जबाबदारी यावर मात्र प्रश्नचिन्ह आहेत. कारण, वाघांच्या स्थलांतरणाने अनेक नवे संचारमार्ग, जंगलांची संलग्नता उघडकीस आली आहे. अशा वेळी त्या संचारमार्गाची सुरक्षितता राखणे आवश्यक असताना त्यावर अजूनही काम झालेले नाही. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वाघ बाहेर फिरणे हे एकवेळ मान्य, पण पावसाळ्यात वाघ त्याचे क्षेत्र सोडून जात असेल तर त्यामागे आणखीही कारणे आहेत. मान्सूनदरम्यानचा काळ हा वाघांचा प्रजनन काळ असतो. नागझिरा अभयारण्यातून अधिकांश झालेले वाघांचे स्थलांतरण हे याच कारणामुळे झालेले आहेत. ‘आयात’ आणि ‘जय’ या वाघाचे स्थलांतरण झाले तेव्हा नागझिरा अभयारण्यात नऊ वाघ होते. त्यातील सात वाघ तर दोन वाघीण होत्या. त्यांच्या स्थलांतरणामागे प्रजनन काळातील जोडीदाराची गरज हा निष्कर्ष अभ्यासातून निघाला. सात नर वाघ आणि दोन वाघिणी यामुळे आपले अधिकारक्षेत्र कायम राखण्यासाठी जंगलाबाहेर पडण्याचा प्रकारही या वेळी स्पष्ट झाला. याशिवाय नागझिऱ्यातील वाघांच्या स्थलांतरणामागे ‘प्रे-बेस’ची कमतरता हाही मुद्दा स्पष्ट झाला.
स्थलांतराची कारणे वेगळी
वाघांच्या स्थलांतरणाचा मार्ग हा मानवी कल्पनेच्या बाहेरचा आहे. ‘बली’ या वाघाने निवडलेला मार्ग त्यांनी स्थलांतरणासाठी निवडलेल्या मार्गानी जंगलाची संलग्नता, संचारमार्ग अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे वाघांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या संचारमार्गाची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जोडीदाराचा शोध हे स्थलांतरणमागील आणखी एक नवे कारण समोर आले आहे. अशा वेळी जंगलात वाघ आणि वाघीण यांचा समतोल, त्यांची संख्या आणि जंगलक्षेत्र हेही मुद्दे तेवढेच महत्त्वाचे आहेत. नागझिरा-नवेगावमध्ये आणखी काही वाघांचे स्थलांतर समोर येऊ शकते, असे गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर म्हणाले.
- नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ मध्ये ‘कानी’ नावाच्या वाघिणीने न्यू नागझिरा अभयारण्यातून जंगलक्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, धरणे असे तब्बल ६९.२ किलोमीटरचे अंतर पार करत नवेगाव अभयारण्यात स्थलांतरण केले. २ ऑगस्ट २०१४ मध्ये भरदिवसा ती कोका-चंद्रपूर या राज्य महामार्गावर आढळली. २३ नोव्हेंबर २०१४ ला चुलबंध धरण ओलांडून तिने जांबडीच्या दिशेने प्रयाण केले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा ओलांडताना ती देवरीच्या गावकऱ्यांना दिसली आणि ३ डिसेंबर २०१४ ला नवेगाव अभयारण्यात तिचे स्थलांतरण उघडकीस आले.
- फेब्रुवारी २०१३ मध्ये न्यू नागझिऱ्यातील ‘अल्फा’ या वाघिणीचा बछडा ‘आयात’ने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्य़ातील वारासिवनी जंगलापर्यंत ६० किलोमीटरचे अंतर पार केले होते. येथेही या वाघाने राष्ट्रीय महामार्ग, नद्या, रेल्वे मार्ग पार करत हे स्थलांतरण केले. ‘अल्फा’ वाघिणीच्या दुसरा बछडा ‘प्रिन्स’ने २०१०-११ मध्ये मध्यप्रदेश पेंच व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरण केले होते.
- जुलै-ऑगस्ट २०१३ मध्ये नागझिरा अभयारण्यातून ‘जय’ नावाच्या वाघाने सुमारे १०० किलोमीटरचे अंतर पार करत उमरेड-करांडला अभयारण्यात स्थलांतरण केले आणि आता मे २०१७ मध्ये त्याच ‘जय’ या वाघाचा बछडा ‘बली’ने सर्वाधिक सुमारे १५० किलोमीटरचे अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले.
- जानेवारी २०१७ मध्ये कळमेश्वर कोंडाळीच्या राखीव जंगलातील वाघाने अमरावती जिल्ह्य़ातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात सुमारे १०० ते १२० किलोमीटरचे एरियल अंतर पार करून स्थलांतर केले. कळमेश्वरमध्ये नवाब या नावाने परिचित हा वाघ पोहऱ्याचा राजा झाला. कळमेश्वरच्याच जंगलातून बोर अभयारण्यात एका वाघाने स्थलांतर केले.
- २०१५-२०१६ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोळसा वनक्षेत्रातून एक वाघ नागझिऱ्यात स्थलांतरित झाला.