बुलढाणा : मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात दाखल झाली आहे. आज नऊ ठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये मिशनचे संदीप शेळके यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली. त्यांनी तीस वर्षांत विकासाच्या दृष्टीने काय दिवे लावले? असा सवाल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० मार्चला  देऊळगाव साकर्शा, पारखेड, मांडवा, पाथर्डी, बोथा, वरवंट, घाटनांद्रा, लोणी काळे  निंबा, जानेफळ, माळेगाव, सावत्रा या गावात त्यांनी सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी खासदार आणि आमदार संजय रायमूलकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. शेळके म्हणाले की, तुम्ही त्यांना १५ वर्षे आमदार केलं, युुतीच्या काळात मंत्रिपद मिळाले. नंतर १५ वर्षे खासदार केले. एवढेच नव्हे तर त्यांनी सांगितलेल्या माणसालाही (रायमूलकर) आमदार केलं. मात्र, मेहकर विधानसभा मतदारसंघातील समस्या आजही जैसे थे आहेत. पिण्याच्या पाण्यासारखी समस्या अजून सोडवता येत नसेल तर सत्तेत असून काय फायदा? लोकांना मते मागतांना काहीच कसे वाटत नाही? असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

हेही वाचा >>>चंद्रपूर : लोकसभा उमेदवारीसाठी वडेट्टीवार विरूध्द धानोरकर वाद! शिवानी वडेट्टीवार समर्थकांसह थेट दिल्लीत…

दरम्यान, शेळकेंच्या या विधानावर शिवसेनेचे मेहकर शहर प्रमुख ( शिंदे गट) जयचंद बाठीया यांनी प्रतिक्रिया म्हणाले, की आपण कोणाविरुद्ध बोलत आहेात याचे भान ठेवावे. एकही निवडणूक न लढणाऱ्या शेळकेना असा जाब विचारण्याचा अधिकारच नाही. जालना खामगाव रेल्वेमार्ग, समृद्धी महामार्ग सह रेल्वे स्थानक सुधारणा, महिला बचत गट आणि केंद्राच्या अनेक योजना खासदारांनी राबविल्या आहे.