राज्यातील चंद्रपूर हे महत्त्वपूर्ण औद्योगिक शहर आहे. मात्र, येथील नागरिकांना रेल्वेच्या सुविधा मिळत नसल्यामुळे चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने रेल्वे प्रशासनाविरोधात सोमवारी, १३ मार्चला जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवून आंदोलन केले.मुंबईला जाणारी रेल्वेगाडी बंद करण्यात आली आहे. सेवाग्राम एक्सप्रेससुध्दा बंद करण्यात आली आहे. यामुळे चंद्रपूरातील नागरिकांना मुंबई, सेवाग्राम, नागपूर जाण्यास अडचणी होत आहे.
हेही वाचा >>> “शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा गळफास लावून घेणार”, स्वाभिमानीचा सरकारला इशारा; चक्क स्मशानभूमीत आंदोलन
या रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्या यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. मात्र, रेल्वे विभागाने मागण्याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे प्रशासनाविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री, सचिव नरेंद्र सोनी, रमणिकभाई चव्हाण, प्रदीप माहेश्वरी, पूनम तिवारी, रमेश बोथरा, डॉ. भुपेश भलमे, डॉ मिलिंद दाभोरे, नरेश लेखवाणी, संजय मंगाणी, अशोक रोहरा, श्याम सारडा, गौतम यादव व शंकरसिंह राजपुरोहित, चंद्रकांत बजाज, महावीर मंत्री, दिनेश बजाज, सुशील मुंधडा, घनश्याम मुुंधडा, शिव सारडा, सुधीर बजाज, श्रीकांत बजाज, अनिल राठी, श्रीराम तोषनीवाल, मिलिंद कोतपलिवार, डॉ प्रफुल भास्करवार, अरविंद सोनी, मनीष चकलनवार, अमित कासनगोट्टूवार, आशीष खोरिया यांच्यासह रेल्वेचे स्थानक प्रबंधक श्री कृष्णा नंद राय, वीण कुमार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.