बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या जिव्हारी लागला, असे म्हटल्यास ती राजकीय अतिशयोक्ती ठरणार नाही. मतदारसंघात असे विचित्र आणि तितकेच मजेदार चित्र निर्माण झाले आहे.

बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात अगदी मतमोजणीपर्यंत चुरशीची लढत झाली. नशीब खराब म्हणून काट्याच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके केवळ ८४१ मतांच्या फरकाने पराभूत झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे अल्पमतांनी विजयी झाले. हा पराभव जयश्री शेळके यांच्यासाठी कायम भळभळणारी जखम ठरली आहे. मात्र या निसटत्या विजयाने सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले संजय गायकवाड हे देखील व्यथित आहेत. बुलढाणा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली, नागरिकांना रुग्णालय ते घरगुती संकटातही मदत करूनही एकेका मतासाठी हात पसरावे लागले, झुंजावे लागले अशी त्यांची खंत वा सल आहे. आपल्या स्फोटक विधानामुळे राज्यात परिचित आमदार गायकवाड यांनी निवडणुकीत कमालीचा संयम पाळत वादग्रस्त विधान , अगदी जयश्री शेळके विरुद्ध जहाल विधान करण्याचे टाळले! जयश्री शेळके सह काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध जहाल टीका करीत त्यांना ‘उचकविण्याचा’ आटोकाट प्रयत्न केला.मात्र त्यांनी प्रचारातील आपले राजकीय मौन कायम ठेवले.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना सवाल

हेही वाचा…पराभवानंतरही काँग्रेसच्या बंटी शेळकेंकडून रॅलींचा धडाका… हे आहे कारण…

u

मौन सोडताच स्वकीयांवर डागली टीकेची तोफ

मात्र अखेर त्यांचा संयम बुलढाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात तुटलाच! राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान व्हावे यासाठी स्थानिय विष्णुवाडी मधील गजानन महाराज मंदिरात महाआरती आणि आमदारांच्या सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी अखेर आपल्या राजकीय मौनाचा त्याग करून मनातील खदखद आक्रमक पणे व्यक्त करीत गौप्यस्फोट केले. निवडणुकीत कोणत्याच नेत्याने माझे काम केले नाही.अगदी केंद्रीय मंत्री (प्रतापराव जाधव) आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांनीही माझं काम केले नाही. काम (प्रचार) तर सोडाच, पण विरोधी पक्षाचे (ठाकरे गटाचे) तिकीट ‘त्यांना’ मिळवून देण्याचे काम केले, असा सनसनाटी आरोप करून त्यांनी धमाल उडवून दिली.

हेही वाचा…एसटीच्या ‘शिवशाही’ बस अपघाताचे प्रमाण सर्वाधिक, ही आहेत कारणे…

‘आमचे केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी यावेळी केला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड आपल्या मनातील शल्य बोलून दाखविताना म्हणाले की एकही(मित्र) पक्षाचा नेता माझ्या सोबत नव्हता,भाजपाचे अनेक नेते,आमचे केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते, भाजपाचे जिल्ह्यातील प्रमुख। नेते आमदार संजय कुटे आणि आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तर आमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे तिकीट फायनल केल्याचा गंभीर आरोपही आमदार गायकवाड यांनी केला . मतदारांविषयची नाराजी देखील त्यांनी बोलून दाखविली. आपण बुलढाणा शहराचा चेहरा बदलला, मतदारसंघात कोट्यवधीची विकास कामे केल्याने ही लढत सहज जिंकू असा आत्मविश्वास होता.मात्र अत्यल्प मतांनी जिंकल्याने सत्कार स्वीकारण्याची देखील मानसिकता नाही.एकेक मतांसाठी भीक मागावी लागत असेल, शहरात लंडन मिळता मागे राहिल्याने लोकशाही वरचा विश्वास उडतो. फक्त पैश्यासाठी लढणाऱ्या विरोधक सोबत लोक गेल्याने भविष्यात निवडणूक लढवावी की नाही?असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. दरम्यान या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे.

Story img Loader