बुलढाणा: राजकारणात तडजोड करावी लागते, मात्र मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडण्या इतकी तडजोड शिवसेना करणार नाहीच, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. बुलढाणा मतदारसंघ सेनेचाच, तो भाजपला देण्याचा प्रश्नच नाही, असे ते ठासून म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा शहर परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना आमदारांनी सडेतोड उत्तरे दिली.

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

आमदार म्हणाले की, राजकारणात तडजोड करावी लागते. मात्र लोकसभेच्या आमच्या विद्यमान खासदारांच्या जागा जातील अशी तडजोड, शिवसेना अजिबात करणार नाही. शिवसेनेला लोकसभेच्या केवळ दहा ते अकरा जागा देऊन बोळवण करण्यात येणार असल्याच्या राजकीय चर्चा वायफळ असल्याचे त्यांनी सांगितले. तसं होणार नाहीच असे सांगून या जागांचा तपशील व सेनेची भूमिकाही गायकवाड यांनी मांडली.

हेही वाचा – “चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार,” आघाडी, युतीच्या उमेदवारांना पक्षनेतृत्वाचे आश्वासन; संभ्रम वाढला !

आमच्या विद्यमान खासदारांच्या जागा आणि (एकसंघ) शिवसेनेने मागील लढतीत जिंकलेल्या व आम्ही जिथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलो त्या जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे. यात काही बाबतीत तडजोड करु, मात्र सेनेला २१ ते २२ जागा मिळाव्यात ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे मांडली असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – “संजय राऊत खोटे बोलताहेत,” प्रकाश आंबेडकर यांचे विधान; म्हणाले, “आधी भांडणे मिटवावीत…”

बुलढाणा लोकसभेची जागा ही गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेची आहे. याठिकाणी सातत्याने शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay gaikwad says buldhana constituency belongs to shivsena there is no question of giving it to bjp scm 61 ssb
Show comments