अमरावती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांच्या बडतर्फीचे सत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून कायम आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय खोडके यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून तसेच प्रदेश उपाध्यक्षपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. शपथविधीसाठी संजय खोडके उपस्थित राहिले, त्यांचे हे कृत्य पक्षशिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी असल्याने त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्रात म्हटले आहे. यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.
अमरावती : संजय खोडके राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदावरून बडतर्फ, शपथविधीसाठी उपस्थित राहणे भोवले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांच्या बडतर्फीचे सत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून कायम आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-07-2023 at 09:56 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay khodke sacked from the post of regional vice president of ncp mma 73 amy