नेर तालुक्यातील मांगलादेवीपासून एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर उलटल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. यावेळी येथून पालकमंत्री संजय राठोड यांचा ताफा जात होता. त्यांनी वाहन थांबवून जखमींना नेर व यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. अपघातातील जखमींसाठी पालकमंत्री संजय राठोड स्वत: धावून आल्याने त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा- “भाजपाचं हिंदुत्व बेगडी” अशी टीका करत कसब्याचे उमेदवार आनंद दवे म्हणाले, “पंतप्रधान मोदींना बोहरी समाज…”

नेमकं काय घडलं?

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड मांगलादेवी येथील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यांचा ताफा मांगलादेवीकडे जात असतानाच गावानजीक ट्रॅक्टर उलटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आपला ताफा थांबवून घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी दोन मजूर गंभीर जखमी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.

हेही वाचा – ‘किती हे सुडाचे राजकारण…’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्वीट चर्चेत; ठाण्यात वाद उफाळण्याची चिन्ह!

दरम्यान, मंत्री राठोड यांनी तत्काळ दोघांनाही आपल्या ताफ्यातील एका गाड्यांमधून एकाला नेर येथील सरकारी रुग्णालयात तर अन्य एकाला खासगी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचं बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे मंत्री राठोड आपला ताफा थांबवून मजूरांच्या मदतीला धावून आल्याने त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Story img Loader