यवतमाळ : ‘द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अन्न व औषध प्रशासन खात्याची चौकशी करण्याची केलेली मागणी तथ्यहीन असून, या संघटनेच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. आमच्या विभागाने असोसिएशनमधील अनेकांवर विविध तक्रारींसंदर्भात कारवाई केली आहे. या कारवाईस स्थगिती मिळावी, यासाठी आपल्यावर दवाब आणण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. मात्र आपण कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसून अयोग्य प्रकरणात कारवाई केलीच जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येथील विश्रामगृहात आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात कोणत्याही कामाचे प्रचंड पैसे मागितले जातात त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला असून या खात्याची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक व इतर अधिकारी प्रत्येक कामासाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप असोसिएशनने केला आहे. हे सर्व आरोप फेटाळून लावत संजय राठोड यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : नक्षलसमर्थक प्रा. साईबाबा याला निर्दोष सोडण्याचा आदेश रद्द, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की..

कोविड काळात शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने बोगस व बनावट औषधी विक्री प्रकरणात अनेकांवर कारवाई केली. काहींवर विविध न्यायालयात खटलेसुद्धा दाखल आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी मुंबईतील सौफी हॉस्पिटलमध्ये मंत्रालयातील एका उपसचिवाचा चुकीचे इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी अधिकाऱ्याच्या पत्नीने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दिल्यानंतर चौकशी समिती नेमली. या चौकशीत वापरलेले इंजेक्शन बनावट असल्याचे आढळले. त्यामुळे या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन उत्पादक, वितरक, विक्रेते अशा ४० प्रतिष्ठानांवर कारवाई केली. या कारवायांना स्थगिती मिळावी, असा संघटनेचा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: ताडोब्यात वाघ बघायला जाताय? आधी हे वाचा..

त्यासाठी संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पत्र लिहून कारवाई न करण्याची विनंती केली. मात्र आपण नियमाप्रमाणे कारवाई केल्याने संघटना आता आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे संजय राठोड म्हणाले.  कारवाईला न्यायालयात आव्हान देण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, असे राठोड  म्हणाले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. बनावट, बोगस औषधी उत्पादन, वितरण, विक्री यासह विविध अनागोंदी केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांच्या पातळीवर चालते. यात सामान्य नागरिकांची फसवणूक होते. असेले प्रकार खपवून घेतले जाणार नसून, चुकीची कामे करणाऱ्यांविरोधात आता अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही संजय राठोड यांनी दिला.