Effigies in Marbat Procession विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक उद्या शुक्रवारी सकाळी निघणार आहे. यावेळी ऐतिहासिक काळी व पिवळी मारबत सोबतच सनातन धर्मावर टीका करणारे तामिळनाडूचे मंत्री स्टॅलिन, सकाळचा भोंगा अशी टीका केलेला शिवसेनेचे नेते संजय राऊत, शिंदे सरकारमधील ५० खोके, महागाई, महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासमधील भ्रष्टाचार, गंगा जमुनाचे समर्थन करणारे दलाल आदी विषयावरील बडगे यार्षीच्या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभाग हाऊसफुल्ल; औषधी नसल्याने खासगीतून खरेदीचा सल्ला

मारबत मिरवणुकीसाठी काळी व पिवळी मारबत आठ दिवस तयार करण्यात आल्या असून त्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर आता मासुरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकटनगर, पिवळीनदी, इतवारी, लालगंज, खैरीपुरा, प्रेमनगर, नंदनवन झोपडपट्टी भागात बडगे तयार केले जात असून उद्या बडगे मारबत मिरवणुकीत निघणार आहे. दीडशे वर्षापासून सुरू असलेली ही मारबतची परंपरा पोळ्याचे खास आकर्षण असते. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या अन्यायाला आणि ब्रिटीशांचे समर्थन करणाऱ्या बकाबाईचा विरोध करण्याच्या उद्देशाने मारबत शहरात फिरत असे. आता विविध सामाजिक अपप्रवृतींच्या विरोध करण्याचे मारबत हे एक प्रतीक झाले आहे. मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. यंदाही ही परंपरा कायम असणार आहे. उद्या सकाळी १० वाजता काळी जागनाथ बुधवारीतून पिवळी मारबत व मस्कासाथ येथून पिवळी मारबत निघणार असून नेहरू पुतळा चौक येथे भेट होईल. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागपूरकरांची गर्दी या ठिकाणी अनुभवता येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut udhayanidhi stalin effigies in traditional marbat procession vmb 67 zws