नागपूर : भारतीय विद्या भवन शाळेतील (आष्टी) सारंग नागपुरे (८) रा. जयताळा या विद्यार्थ्याचा गुरुवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. १ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस होता. शालेय परीक्षेमुळे हा कार्यक्रम नंतर करण्याचे नियोजन होते. परंतु आधीच त्याचा मृत्यू झाल्याने नागपुरे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मराठ्यांचे आंदोलन शांत होताच आता वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ‘या’ आहेत मागण्या..

हेही वाचा – अकोला : पारंपरिक इंधनाच्या वाहनांकडेच अधिक कल, सणासुदीच्या काळात सर्वाधिक विक्री

सारंगचे वडील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असून आई उच्च न्यायालयात वकिली करते. सारंगला एक मोठा भाऊ असून तोही याच शाळेत शिकतो. सारंगचा १ नोव्हेंबरला वाढदिवस होता. त्याला वाढदिवसाच्या कार्यक्रमात सर्व मित्रांना बोलावून धम्माल करायची होती. परंतु परीक्षा सुरू असल्याने त्याच्या आई-वडिलांनी समजूत काढत त्याला परीक्षेनंतर वाढदिवस साजरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २ नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना घडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarang died before celebrating his birthday nagpure family in tears mnb 82 ssb