नागपूर : हिंगणा परिसरातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस पर्यटनाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात खाली कोसळली. या विचित्र अपघातात एक विद्यार्थी ठार झाला तर ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास झाला. जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकांनी अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना मदत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…फडणवीसांच्या नागपुरात ना आरती, ना यज्ञ, पण लोकांना विश्वास ‘तेच’ होणार …

या अपघाताची माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बोबडे हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली. अपघात होताच रस्त्यांनी जाणाऱ्यानी गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती.

पालकांनी घेतली रूग्णालयाकडे धाव

सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या पाच बसेस विद्यार्थ्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील बोरधरण जात होते. देवळी परिसरात बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली. अनेक पालक सकाळी रुग्णालयात पोहचले. आपापल्या मुलाची विचारणा शिक्षकांना करीत होते. त्यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला होता.

गावकऱ्यांची आक्रमक भूमिका

हिंगणी रस्त्यावरून कवडसकडे जाताना पेंढरी देवळी गावाजवळ अपघातप्रवण वळण आहे. या वळणावर गेल्या तीन वर्षात २८० पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. तर गेल्या महिन्यात ८ अपघात झाले आहेत. हा वळण रस्ता सरळ करण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने देऊन प्रयत्न केले आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. ‘हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा रस्ता बंद करू’ असा आक्रमक पवित्रा पेंढरी- देवळी गावकऱ्यांनी घेतला आहे.

बस चालकावर गंभीर गुन्हे दाखल – पोलीस उपायुक्त लोहित मतानी

शंकरनगरातील सरस्वरती शाळेच्या ५२ विद्यार्थ्यांना घेऊन बोरधरण येथे सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा देवळी-पेंढारी गावाजवळील वळणावर भीषण अपघात झाला. हा अपघात बसचालकाच्या चुकीमुळे झाला आहे. त्यामुळे हिंगणा पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपघातात निर्वाणी शिवानंद बागडे (१५, रा. सिमटाकळी,एमआयडीसी)ही विद्यार्थिनी ठार झाली असून जखमी झालेल्या ४४ विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात, ७ विद्यार्थ्यांना निम्स रुग्णालयात तर एका विद्यार्थ्याला प्लाटिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन शिक्षक, एक कर्मचारी आणि बसचालकसुद्धा जखमी झाले आहेत. रुग्णालयात पालक, नागरिक, नातेवाईक, शाळेतील शिक्षकांसाठी ‘मदत केंद्र’ तयार करण्यात आले आहे.