यवतमाळ : जिल्ह्यात आज सात विधानसभा मतदारसंघात उत्साहात मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६१.२२ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी हाती येईपर्यंत किमान ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत ७.१७ टक्के मतदान झाले होते. वणी विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी वाढती राहिली. सकाळी ११ वाजेपर्यंत १९.३८ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३४.१० टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.८१ तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी ७० टक्केच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

हेही वाचा – कराळे मास्तरला चोपले; भाजप कार्यकर्त्यांशी वाद भोवला…

सकाळी उत्साहात सुरू झालेले मतदान १० वाजतानंतर काहीसे मंदावले. मात्र, दुपारी पुन्हा जोमाने मतदानास सुरवात झाली. ग्रामीण भागात, शहरातील गजबजलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यवतमाळ विधानसभा मतदारसंघात ५३.४० टक्के, आर्णी ६२.०७ टक्के, दिग्रस ६५.३३, पुसद ५७.७२, राळेगाव ६७.७५, उमरखेड ६०.३८, तर वणी विधानसभा मतदारसंघात ६३.७३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले तर सर्वात कमी मतदान यवतमाळमध्ये झाले. मतदानादरम्यान काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात १०२ उमेदवार रिंगणात असून आज मतदान करताना सर्वच उमेदवारांनी स्वत:च्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आता मतदार कोणाच्या पारड्यात विजयाचे मत टाकतात, हे शनिवारी स्पष्ट होईल. मतदान संपताच सर्वत्र कोण निवडून येईल, याचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. महायुती की, महाविकास आघाडी याची चर्चा गावागावात रंगली आहे.

हेही वाचा – बुलढाण्यात मतदान उत्साहात; ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्क्यांपेक्षा जास्त…

गावात काही काळ तणाव

उमरखेड तालुक्यातील सुकळी (ज.) येथील भाजपचे सरपंच शिवाजी रावते यांच्यावर तेथील विशिष्ट समुदायाच्या तरुणांनी मतदान केंद्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात रावते गंभीर जखमी झाले. घटनेची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. राजकीय वैरातून हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सुकळी हे संवेदनशील गाव आहे. त्यामुळे ही घटना घडताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेने गावात काही काळ तणाव पसरला होता.

Story img Loader