चंद्रपूर : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यातील ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेश्राम यांचा सत्कार होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असून त्या गावात प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पोहोचले आहे. जिल्ह्यातील अनेक गावे हर घर जल घोषित झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्या गावातील सरपंच किंवा तेथील ग्रामपंचायत सदस्य समिती, स्वयं सहायता बचत गट यांनी चांगले काम केले आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

हेही वाचा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास २०० रुपये दंड, नागपुरात कारवाई सुरू, राज्यात लवकरच अंमलबजावणी

केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. १५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदरी निराशा, बैठकीकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

चंद्रकला मेश्राम यांच्या  निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.