वर्धा : गावाचा कारभार प्रामुख्याने गावातून गोळा होणाऱ्या करावरच चालतो. पण, कर भरण्यास ग्रामस्थ टाळाटाळ करण्याची बाब सार्वत्रिकच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी गावच्या सरपंच प्रांजली भोयर व त्यांच्या महिला सदस्य सहकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढविली. कर भरणा करा व वर्षभर धान्य मोफत दळून घ्या. त्यासाठी ग्रामपंचायतने चक्की विकत घेतली.
हेही वाचा – नागपूर : जाहिरात फलकांचा थकीत कर न भरल्यास कारवाई
हेही वाचा – राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक
पहिल्या ग्राहक लक्ष्मी दुरुगकर ठरल्या. त्यांनी शंभर रुपये कर भरला व त्याचवेळी दळण दळून घेतले. यास पुढेही प्रतिसाद लाभेल, असा विश्वास सरपंच भोयर व्यक्त करतात.ग्रामपंचायत सदस्य अरुणा भोंगडे, रंजना उईके, शुभांगी राऊत सचिव दीपिका धोटे यांनी या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे.