चंद्रपूर : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ केल्याने गावकरी संतप्त हाेवून सरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांना तब्बल साडेतीन तास ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथे घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी ७ नोव्हेंबरला ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. परंतु सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली ही ग्रामसभा बुधवारी घेण्याचं ठरलं. सभेला सरपंच अरविंद कोहपरे, ग्रामसेवक प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती. सरपंचांनी सभेला सुरुवात केली. काही वेळातच ग्रामसभा संपली. ग्रामसभेत मालमत्ता कर व पाणीपट्टी वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांचा पारा चढला. अनेक ग्रामस्थ सभेला येणार होते. परंतु ते येण्यापूर्वीच सभा आटोपण्यात आली. त्यामुळं संतापलेल्या ग्रामस्थांनी सदस्यांना कार्यालयात कोंडले व कुलूप लावले.

हेही वाचा – १४ वर्षांची मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती, उच्च न्यायालय म्हणाले…

हेही वाचा – गृहमंत्र्यांच्या शहरात ऑटोरिक्षा चालकांमध्ये नियम मोडण्याची स्पर्धा

पोलिसांच्या मध्यस्थीने सर्वांची सुटका झाली. सरपंचांच्या परवागनीनं पाणीपट्टी व मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय नियमानुसार आहे, असं ग्रामसेवकाचे म्हणणे आहे. तर,आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं करवाढ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarpanch secretary along with gram panchayat members were locked into gram panchayat due to increase in tax incident at devpayali in chandrapur district rsj 74 ssb