लोकसत्ता टीम

चंद्रपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरकैदेत आहे. संघ हा समाजात विष पेरण्याचे काम करतो. चंद्रपूरचे रहिवासी असलेल्या संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या घरी जावून विचारले पाहिजे तुम्हाला संविधान मान्य आहे की मनुस्मृती, संघाने स्वातंत्र्यानंतर संघ मुख्यालयावर तिरंगा ध्वज का फडकवला नाही असा प्रश्न करा असे ॲड. असीम सरोदे म्हणाले. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपला पराभूत करण्याचे आवाहन केले.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

गुरुवारी संध्याकाळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडांगणावर निर्भय बनो सभा पार पडली. सभेला ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी उपस्थित होते. प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या सभेला मार्गदर्शन करताना ॲड. सरोदे म्हणाले, आमचा लढा हा मोदी- शाहा या व्यक्तीबद्दल नाही तर प्रवृत्ती विरुद्ध आहे. देशात आणीबाणी लादली गेली ही चूक लक्षात आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जनतेची जाहीर माफी मागितली होती. त्यांचे नातू राहुल गांधी यांनी देखील जाहीर माफी मागितली आहे. मात्र वारंवार खोटं बोलून, जनतेची दिशाभूल करून, महिलांवर बलात्कार, विनयभंग करणाऱ्या खासदारांना सोबत घेऊन, गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या सोबत घेत हुकूमशाहीकडे देशाला घेऊन जाणारे मोदी साधी माफी मागायला तयार नाहीत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या एकाही उमेदवाराला निवडून द्यायचे नाही. महाराष्ट्रात उजेड पसरविणाऱ्या चंद्रपुरातून भारतभर प्रकाश पसरला पाहिजे व अंधारमुक्त देश झाला पाहिजे असेही सरोदे म्हणाले.

आणखी वाचा- नागपूर : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, ड्रीम फॅमिली स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’

आज देशाच्या रागुन्हेगारीेतून राजकारणात आलेल्या व्यक्तीला थेट गृहमंत्री बनविण्यात आले. आत्मनिर्भर शब्द महात्मा गांधी यांनी दिला तो नरेंद्र मोदी यांनी चोरला. लोकांच्या मनात मोठा राग व असंतोष आहे. तेव्हा या असंतोषाचे जनक तुम्ही बनू शकता व परिवर्तन घडवून आणू शकता. चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी झोपून आहेत. वाघाच्या नावाने राजकारण सुरू, १२ ते १५ कोटी रुपये खर्च महोत्सवावर होतो. ताडोबा महोत्सव आदिवासींसाठी होता का, जंगलासाठी होता का, प्रान्यांच्या संरक्षणासाठी होता का, मुनगंटीवार यांच्या प्रमोशन साठी होता. मोदी दररोज स्वतःच्या प्रमोशन साठी एक कोटी रुपये खर्च करतात. हा गुन्हेगारी स्वरूपाच्या खर्च आहे. तेव्हा २०२४ च्या निवडणुकीत याचा जाब विचारा असेही सरोदे म्हणाले. ५० कोटीच्या वृक्षारोपण बद्दल विचारा लंडन येथील वाघनखांचा करणार जाहीर करावा, सध्या लपवा लपवीचे राजकारण करीत आहे. व्यवस्थेतील लोक पाळीव प्राण्या सारखे वागत आहेत. पोलिस, न्यायाधीश, सीबीआय , इडी ठरवून दिल्याप्रमाणे काम करत आहे. कायद्याबद्दलचा भेदभाव नष्ट झाला पाहिजे.

महागाई, बेरोजगारी बद्दल मोदी बोलत नाही. विद्यार्थी मुलांच्या भविष्याशी सरकारने खेळ चालविला आहे. स्पर्धा परीक्षांचे ७० पेपर लीक झाले आहे. ४५ वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे. प्रत्येक तासाला २ बेरोजगार आत्महत्या करीत आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. षडयंत्र करून बँकेच्या माध्यमातून वळवत मोठा भ्रष्टाचार केला आहे असेही ते म्हणाले. विद्यार्थी, बेरोजगार, शेतकरी, दलीत समाज व महिला मोदी सरकार उलटवतील असा विश्वास व्यक्त केला. डॉ. विश्वंभर चौधरी यांनी महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उत्तरप्रदेशकरन सुरू असल्याची टीका केली. मोदी समर्थक हा अध्यात्मिक हिंदू नाही तर राजकीय हिंदू आहे. मूळ हिंदू विरुद्ध राजकीय हिंदू अशी ही लढाई आहे. ज्यांच्या डीग्रिचा पत्ता नाही ते विश्व गुरू बनले आहेत तर उच्च विद्या विभूषिताला मोनिबाबा व पप्पू ठरविले जात आहे असेही चौधरी म्हणाले.

आणखी वाचा- मुनगंटीवारांसमोर पक्षातील विरोधकांशी जुळवून घेण्याचे आव्हान

प्रास्ताविक बंडू धोत्रे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश दुधापचारे यांनी केले. आभार उमाकांत धांडे यांनी मानले. कार्यक्रमाला काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर, शहर अध्यक्ष रामु तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना अध्यक्ष संदीप गिऱ्हे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सुनील मुसळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कोट्यवधी रुपये खर्च करून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले महोत्सव वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ब्रॅण्डिंग साठी आहेत. शिवाजी महाराज यांचे नाव सांगून लंडन येथील आणली जाणारी वाघ नखे हा ब्रॅण्डिंगचा प्रकार आहे असाही आरोप सभेत ॲड. सरोदे व चौधरी यांनी केला.