महाराष्ट्रात केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अस्तित्व

नागपूर : महाराष्ट्रात सारस पक्षी केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. भारतातही हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. देशात केवळ १५ ते २० हजार तर जगभरातही केवळ २५ ते ३७ हजारच सारस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात सारस पक्ष्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील तीनपैकी  दोन जिल्ह्यात सारस संवर्धन समिती गठीत झाली असून एका जिल्ह्यात अजूनही समितीचे गठन व्हायचे आहे.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत

भारतीय उपखंडात सारस उत्तर आणि मध्य भारत, तराई नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळतो. २०१८च्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मिळून १४ हजार ९३८ सारस शिल्लक आहेत. यापैकी बहुतांश सारस उत्तर प्रदेशात असून या राज्याचा तो राज्यपक्षी आहे.  महाराष्ट्रात देखील ४० ते ४५ सारस शिल्लक आहेत. यातील सर्वाधिक सारस गोंदिया, त्यानंतर भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एक सारस आहे. कधीकाळी याच महाराष्ट्रात सुमारे शंभर सारस होते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘आययूसीएन’च्या यादीत या पक्षाची नोंद संकटग्रस्त अशी आहे. सारस हा उडू शकणारा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, पण गेल्या काही दशकात पाच फूट उंच, आठ फूट लांब पंख आणि सात किलो वजनाच्या या पक्ष्याची संख्या उच्चदाब वीजवाहिन्या, रायासानिक खते आणि कीटकनाशके आदींमुळे झपाटय़ाने कमी होत आहे. महाराष्ट्रात या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवण्याचा मान गोंदिया जिल्ह्यातील ‘सेवा’ या संस्थेला जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सारस संवर्धनाची धुरा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सांभाळली आहे. वनखाते आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या पक्ष्याची दखल नागपूर उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर वनखाते आणि स्थानिक प्रशासन जागे झाले. नामशेषाच्या मार्गावरील या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सध्यातरी सर्व एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जाग

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सारस संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या आतापर्यंत चार ते पाच बैठका झाल्या असून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.  कधीकाळी चार सारस असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आता एकच सारस शिल्लक आहे. या जिल्ह्यातही सारस संवर्धन समिती स्थापन झाली असून बुधवारी या समितीची पहिली बैठक होणार आहे. मात्र, गोंदियालगतच्या भंडारा जिल्ह्यात गोंदियापाठोपाठ सारसांची संख्या असताना देखील अजूनपर्यंत सारस संवर्धन समिती स्थापन झाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader