महाराष्ट्रात केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अस्तित्व
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : महाराष्ट्रात सारस पक्षी केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. भारतातही हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. देशात केवळ १५ ते २० हजार तर जगभरातही केवळ २५ ते ३७ हजारच सारस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात सारस पक्ष्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील तीनपैकी दोन जिल्ह्यात सारस संवर्धन समिती गठीत झाली असून एका जिल्ह्यात अजूनही समितीचे गठन व्हायचे आहे.
भारतीय उपखंडात सारस उत्तर आणि मध्य भारत, तराई नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळतो. २०१८च्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मिळून १४ हजार ९३८ सारस शिल्लक आहेत. यापैकी बहुतांश सारस उत्तर प्रदेशात असून या राज्याचा तो राज्यपक्षी आहे. महाराष्ट्रात देखील ४० ते ४५ सारस शिल्लक आहेत. यातील सर्वाधिक सारस गोंदिया, त्यानंतर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एक सारस आहे. कधीकाळी याच महाराष्ट्रात सुमारे शंभर सारस होते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘आययूसीएन’च्या यादीत या पक्षाची नोंद संकटग्रस्त अशी आहे. सारस हा उडू शकणारा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, पण गेल्या काही दशकात पाच फूट उंच, आठ फूट लांब पंख आणि सात किलो वजनाच्या या पक्ष्याची संख्या उच्चदाब वीजवाहिन्या, रायासानिक खते आणि कीटकनाशके आदींमुळे झपाटय़ाने कमी होत आहे. महाराष्ट्रात या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवण्याचा मान गोंदिया जिल्ह्यातील ‘सेवा’ या संस्थेला जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सारस संवर्धनाची धुरा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सांभाळली आहे. वनखाते आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या पक्ष्याची दखल नागपूर उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर वनखाते आणि स्थानिक प्रशासन जागे झाले. नामशेषाच्या मार्गावरील या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सध्यातरी सर्व एकत्र आल्याचे दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जाग
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सारस संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या आतापर्यंत चार ते पाच बैठका झाल्या असून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. कधीकाळी चार सारस असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आता एकच सारस शिल्लक आहे. या जिल्ह्यातही सारस संवर्धन समिती स्थापन झाली असून बुधवारी या समितीची पहिली बैठक होणार आहे. मात्र, गोंदियालगतच्या भंडारा जिल्ह्यात गोंदियापाठोपाठ सारसांची संख्या असताना देखील अजूनपर्यंत सारस संवर्धन समिती स्थापन झाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.