चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील चिवांडागावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकाभट्टी या प्राचीन रिठावर सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष आढळून आले आहे. यापूर्वी अनेकदा येथे बहामनी साम्राज्यातील तांब्याची नाणीसुद्धा सापडली असून खेळणी, दिवे, मातीचे भांडे, वरवंटा, रांजन देखील आढळून आले आहे. कधी काळी या ठिकाणी मोठे शहर होते. आज मात्र, ही संस्कृती नष्ट होऊन येथे आज गर्द वनराई फुलली आहे.
भूगर्भात दडलेला इतिहास उत्खननातून पुढे
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्राचीन वस्तींचे अवशेष विखुरलेले आहेत. भूगर्भात दडलेला इतिहास अधूनमधून उत्खनातून पुढे येत असतो. यामुळे चंद्रपूरचा इतिहास अधिक समृद्ध होत चालला आहे. चंद्रपूरच्या इतिहासात पुन्हा भर पडावी, असे संशोधन आता पुढे आले आहे.
सविस्तर वाचा…धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे; तूर, मोहरी व जवसलाही पसंती
कोणत्या वस्तूंचे अवशेष सापडले?
जिल्ह्यातील गोंडपिपरी टेकाभट्टी या प्राचीन रिठावर सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष आढळून आले आहेत. प्रा. सुरेश चोपने यांनी चिवंडा गावापासून चार किलोमीटर अंतरावरील या रिठावर पाहणी केली असता टेराकोटाच्या विविध वस्तूंचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. खेळणी, दिवे, मातीचे भांडे, वरवंटा, रांजन या वस्तूंचा देखील समावेश आहे.
सविस्तर वाचा…यवतमाळ हिट अँड रन प्रकरण, कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडविले
बहामनी साम्राज्यातील तांब्याची नाणी
येथे बहामनी साम्राज्य काळातील तांब्याची नाणीसुद्धा अनेकदा सापडली आहेत. चिवंडा गावात विरगड शिल्प आढळून आले आहे. याच भागात लहान-मोठी अनेक रिठे आहेत. येथे अनेक देखणे शिल्प यापूर्वी सापडले आहेत. या भागात अधिक संशोधन झाले तर सातवाहन काळापासून ते गोंड राजांच्या काळाचा इतिहास पुढे येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या परिसरात अधिक संशोधनाची गरज असल्याचे प्रा. सुरेश चोपणे म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd