नागपूर : नागपुरातील ‘सोलार एक्सप्लोझिव्ह’ या कारखान्यात रविवारी झालेल्या स्फोटामुळे ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जागतिक स्तरावर औद्योगिक स्फोटकांचे उत्पादन करणारी कंपनी सत्यनारायण नुवाल यांच्या मालकीची आहे. नुवाल यांनी अलीकडेच अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला १४ कोटी रुपयांची देणगी दिली होती. दुसरीकडे घातपाताच्या घटनांमध्ये सापडलेल्या स्फोटकांवर या कंपनीचा शिक्का आढळून आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

नागपूरच्या बाजारगावमधील सोलार एक्सल्पोझिव्ह कंपनीत रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कंपनी आणि तिचे अध्यक्ष नुवाल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. नुवाल यांनी १९९५ साली स्थापन केलेल्या या कंपनीने गेल्या दशकभरात स्फोटके आणि संरक्षण साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात लक्षणीय घोडदौड केली. ‘अग्नी’, ‘ब्रह्मोस’ या क्षेपणास्त्रांमध्ये या कंपनीचे प्रोपेलिन हे उत्पादन वापरले जाते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिवंगत सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही पूर्वी कंपनीला भेटी दिल्या होत्या. नुवाल यांचा विविध सामाजिक संघटनांमध्येही सहभाग असतो. राम मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी १४ कोटींची देणगी दिल्याने त्यांचे नाव राजकीय पटलावर चर्चेत होते. याला विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्यांनीही दुजोरा दिला होता. 

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

हेही वाचा >>>“मी प्रश्न अदानींना विचारले, की उत्तर त्यांचे चमचे…”, उद्धव ठाकरेंची टीका

चांगल्या कामांबद्दल जशी कंपनी चर्चेत असते, तशी काही वेळा वादातही अडकल्याचे दिसून येते. देशाच्या विविध भागांत घातपाताच्या घटनांमध्ये सापडलेल्या जिलेटिंग कांडय़ा किंवा तत्सम स्फोटकांवर कंपनीचे नाव आढळून आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकरणी तपासात काय निष्पन्न झाले, हे कळू शकले नसले तरी कंपनीने आपली बाजू वेळोवेळी स्पष्ट केली होती. ‘आम्ही केवळ स्फोटके तयार करतो, खरेदीदार त्याचा कसा आणि कुठे वापर करतात याच्याशी आमचा संबंध नाही’ असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. रविवारच्या स्फोटानंतर कंपनीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक (सीनियर जनरल मॅनेजर) आशीषकुमार श्रीवास्तव यांनी चित्रफितीच्या माध्यमातून भूमिका मांडली. ‘कंपनी नेहमीच कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेते. तरीही या अपघाताबाबत समिती स्थापन करून तिने सुचविलेल्या उपाययोजना लागू केल्या जातील,’ असे ते म्हणाले. मात्र चार महिन्यांत कंपनीत घडलेली ही अशा प्रकारची दुसरी घटना असल्यामुळे सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही सोमवारी याचे पडसाद उमटले. आरोप-प्रत्यारोपांमुळे ही कंपनी व नुवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यासंदर्भात नुवाल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे तसेच लघुसंदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

विधान परिषदेत आज चर्चा

रविवारी घडलेल्या स्फोटाचे तीव्र पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. नियम ९७ अन्वये चर्चेची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच भाई जगताप, शशिकांत शिंदे या विरोधी सदस्यांनी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी आज, मंगळवारी सभागृहात चर्चा केली जाईल व त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगारमंत्री सुरेश खाडे यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जातील, असे सांगितले.

Story img Loader