चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणा-या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांदा पब्लिक स्कूलने आपली यशाची परंपरा कायम राखली असून यात इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी सानवी संजय डिकोंडवार हीने ८५.३३ टक्के गुण प्राप्त करीत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत अकरावे स्थान संपादन करून चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे. तसेच सानवीने नवोदय विद्यालय व सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत देखील उत्तम गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे.

सत्र २०१८-१९ मधील गुणवत्ता यादीत वेदांत येरेकर या विद्यार्थ्याने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ८७.४१ टक्के गुण संपादन करून नववे स्थान पटकाविले तर सत्र २०१९-२० मध्ये हर्षल वाळके याने  ८५.३३ टक्के गुण प्राप्त करून सहावे स्थान प्राप्त केले तसेच सत्र २०२०-२१ मध्ये आशमन भागवत याने ८४.५६ टक्के गुण प्राप्त करून गुणवत्ता यादीत नववे स्थान पटकाविलेे. तीच यशाची परंपरा कायम राखत सानवीने शाळेच्या यशस्वी वाटचालीत मानाचा तुरा रोवला.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
rte admissions process
आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…

हेही वाचा >>> अकोला : काळरुपी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचे दार ‘त्यांच्या’वर कोसळले; उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा करुण अंत

शालेय जीवनात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आत्मसात केलेली कौशल्ये व्यक्तिला जीवनात यशस्वी बनवितात. केवळ दहावीपर्यंतचे असलेले मर्यादित ज्ञान विद्यार्थ्यांना न देता भविष्यात येणा-या स्पर्धापरीक्षेच्या युगात पाऊल टाकण्याकरीता चांदा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम असावा, हे स्वप्न उराशी बाळगून शाळेत स्पर्धा परीक्षांचे वर्ग नियमीत घेतले जातात. राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी आहे. या परीक्षेत शाळेतील इयत्ता आठवीचे व इयत्ता पाचवीचे एकुण ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल दिला.

हेही वाचा >>> शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने २४० रुपयांची सवलत कशी मिळवावी, जाणून घ्या…

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी प्राविण्यप्राप्त सावनीचा व तिच्या पालकांचा गुणगौरव करून सत्कार केला. या प्रसंगी त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच प्रशासकीय सेवेकडे यशस्वी वाटचाल करावी व सुजान नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या भरघोस यशाचे श्रेय विद्यार्थ्यांवर अहोरात्र परीश्रम घेणा-या शिक्षकांना तसेच सदैव शाळेला पाठिंबा देणा-या पालकांना दिले’. प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणा-या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Story img Loader